News Flash

व्यावसायिक नाटय़स्पर्धेत ‘ठष्ट’ची बाजी

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या २६ व्या राज्य मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

| May 3, 2014 06:08 am

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या २६ व्या राज्य मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘ठष्ट’ नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांकाचे हे पारितोषिक ५ लाख रुपयांचे आहे. अष्टविनायक व जिगिषा यांची निर्मिती असलेल्या ‘गेट वेल सून’ आणि ‘कलावैभव’संस्थेच्या ‘थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक’ या नाटकांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे. दिग्दर्शनासाठीचे ७५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी यांना ‘गेट वेल सून’ या नाटकासाठी मिळाले आहे. तर ५० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक संजय पवार यांना ‘ठष्ट’ तर २५ हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक राजीव शिंदे यांना ‘थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक’ या नाटकासाठी मिळाले आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक मोहन जोशी (थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक), अभिजित केळकर (एकदा पाहावं न करून), हेमंत ढोमे (घोळात घोळ), प्रशांत दामले (नकळत दिसले सारे), स्वप्नील जोशी (गेट वेल सून) यांना तर अभिनेत्रींमध्ये रिमा (एकदा पाहावं न करून), माधवी गोगटे (थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक), हेमांगी कवी (ठष्ट), सुपर्णा शाम (ठष्ट), मधुरा वेलणकर (मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस) यांना जाहीर झाले आहे.

*नाटय़लेखन- संजय पवार- ठष्ट,  प्रशांत दळवी- गेट वेल सून, राजीव शिंदे- थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक.
*प्रकाशयोजना- हेमंत कुलकणी- छापाकाटा, प्रदीप मुळ्ये -गेट वेल सून, भूषण देसाई- मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस.
*संगीत दिग्दर्शन- नरेंद्र भिडे- आषाढातील एक दिवस, नरेंद्र भिडे- अलिबाबा आणि चाळीस चोर, मिलिंद जोशी- ठष्ट़
*नेपथ्य – प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदीप मुळ्ये यांना ठष्ठ, गेट वेल सून आणि मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस या नाटकांसाठी़
*वेशभूषा- प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव – गेट वेल सून, पौर्णिमा ओक -ठष्ट, शाम भूतकर – आषाढातील एक दिवस.
*रंगभूषा- राजेश परब/अनिकेत काळोखे- घोळात घोळ, कृष्णा बोरकर, दत्ता भाटकर- थोडसं लॉजिक थोडसं मॅजिक, अशोक राऊत- ठष्ट़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 6:08 am

Web Title: thashta professional drama
टॅग : Marathi Drama
Next Stories
1 मॉडेल पूनम पांडेला अटक आणि सुटका
2 दीपिका, रणवीर, भन्सालींविरोधात अटक वॉरंट
3 २० वर्षांनंतर संगीता बिजलानीचे चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पण
Just Now!
X