News Flash

बापरे! अभिनेत्याने दिली चक्क १ लाख ४० हजारांची टिप

या टिपमधून वेट्रेसने घर खरेदी केले आहे

हॉलिवूड गायक आणि अभिनेता डॉनी वॉलबर्गने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एका हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर तेथील वेट्रेसला २०२० डॉलर म्हणजे भारतीय चलानुसार जवळपास १ लाख ४० हजार रुपांची टिप दिली आहे. डॉनीची पत्नी जेनी हिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोनुसार डॉनीचे हॉटेलमध्ये जेवणाचे ७८ डॉलर (भारतीय चलनानुसार ५६०० रुपये) इतके बिल झाले होते. डॉनीने दिलेली ही टिप सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या २०२० टिप चॅलेंजचा हिस्सा असल्याचे म्हटले जात आहे.

जेनी आणि डॉनी नवीन वर्षाचे स्वागत करत सेंट चार्ल्स येथील IHOP हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. दोघांचे ५६०० हजार रुपयांचे बिल झाले आणि त्यांनी तेथील वेट्रेसला १ लाख ४० हजारांची टिप दिली आहे. कपलने बिल देताना बिलावर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे लिहिले. त्यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. इतकी मोठी रक्कम टिप म्हणून मिळाल्यानंतर वेट्रेस डॅनिअल फ्रांजोनी आनंदी झाली आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिला मिळालेल्या या रक्कमेचा वापर मुलांच्या भविष्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे २०२० टिप चॅलेंज?
‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार हा सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या २०२० टिप चॅलेंजचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. या चॅलेंजमध्ये जेवण वाढणाऱ्या व्यक्तीला नवीन वर्षाच्या आकड्याची टिप देण्यात येते. २०१८ मध्ये या चॅलेंजचे प्रचंड क्रेझ पाहायला मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 11:45 am

Web Title: the 2020 tip challenge spreads thanks to donnie wahlberg and a server in small town michigan avb 95
Next Stories
1 Birthday Special : जाणून घ्या ‘दीप-वीर’ची लव्ह स्टोरी
2 नवरंजन फलाटाचा वेध
3 ‘लूक लूक’ते काही : मुरलेली ‘शिमला मिरची’
Just Now!
X