‘कॉमेडी सर्किट’ या लोकप्रिय कार्यक्रमातून नावारुपाला आलेल्या अपूर्व गुप्ता यांनी काही दिवसापूर्वी मुंबईमधील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये हजेरी लावली होती. यावेळी गुप्ता यांनी नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच मनोरंजन करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं.
अपूर्व एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आल्यामुळे त्यांच्या प्रत्येक शोमध्ये एका सामान्य नागरिकाचं मनोगत मांडण्यात येतं. त्यांच्या प्रत्येक कृतीतून सामान्य व्यक्तीच्या गुणविशेषांचं दर्शन होत असतं. त्यामुळे या कार्यक्रमामध्येही त्यांनी त्यांचं आडनाव कायम ठेवलं आहे. त्यांच्या याच स्वभाव विशेषणामुळे ते कॉमेडी सर्किटमध्ये गुप्ताजी या नावाने ओळखले जातात.
कार्यक्रमातील हे गुप्ताची म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाला आपलासा वाटावा असाच आहे. त्यांच्या प्रत्येक अॅक्टमधून तो कधी तुम्हाला तुमचा मित्र वाटतो तर कधी वडील. त्यामुळे त्यांच्या या व्यतिरेखेतून अनेकवेळा एका कॉमन मॅनचं दर्शन होत असतं. म्हणूनच अनेक वेळा लोक त्याला ‘कॉमन मॅन’ म्हणून संबोधतात.
दरम्यान, कॅनव्हास लाफ क्लबमध्ये देखील त्यांच्या या स्वभावाचं दर्शन प्रेक्षकांना झालं. त्यांच्या निखळ विनोदाने त्यांनी उपस्थितांच मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं.