News Flash

‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा

एका मुलाखतीमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. कुठलीही ओळख किंवा फिल्मी बॅकग्राउंड नसतानाही आज तो बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच त्याच्या ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मनोजने अभिनेता शाहरुख खानसोबतच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नुकतीच मनोजने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खासगी गोष्टी सांगितल्या आहेत. ‘शाहरुख खान हा एकमेव व्यक्ती होता जो त्यावेळी मारुती व्हॅन घेऊन येत असे. माझ्या आजही लक्षात आहे त्यावेळी त्याच्याकडे लाल रंगाची मारुती व्हॅन होती. शाहरुखमुळे मी पहिल्यांदाच दिल्लीतील ताज येथील डिस्कोमध्ये गेलो होतो. त्यावेळी आम्ही तरुण होतो. एकमेकांना भेटायचो. आम्ही बऱ्याचवेळा एकच बीडी शेअर करायचो. शाहरुख त्याच्या पर्सनॅलिटीमुळे महिलांमध्ये लोकप्रिय होता’ असे मनोज म्हणाला.

आणखी वाचा : वयाच्या ४७व्या वर्षी मलायकाला पुन्हा व्हायचंय आई? शोमध्ये केला खुलासा

शाहरुख आणि मनोजने २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर २०१६मध्ये ते दोघे पुन्हा भेटले होते. तेव्हा शाहरुख म्हणाला होता की, ‘मी आणि मनोज एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आम्ही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. मला त्याच्याकडून खूप काही शिकायचे आहे. आम्ही एकत्र खूप मस्ती केली आहे.’

PHOTOS: पत्नी आणि मुलीसोबत अंधेरीमधील ‘या’ आलिशान घरात राहतो मनोज वाजपेयी

लवकरच मनोज वाजपेयीची ‘द फॅमिली मॅन २’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 5:58 pm

Web Title: the family man actor manoj bajpayee recalls shahrukh khan avb 95
Next Stories
1 आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर’
2 Video: ‘द फॅमिली मॅन २’ नवा मजेशीर प्रोमो प्रदर्शित
3 सुष्मिता सेननं दिली गोड बातमी; शेअर केली भली मोठी स्पेशल पोस्ट
Just Now!
X