बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. १९९७ मध्ये तिने शाहरुख खानच्या ‘परदेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण २००६ पर्यंत तिच्या करिअरचा आलेख उंचावण्याऐवजी खालावतच गेला. त्याच त्याच गोष्टी करुन ती कंटाळली अथवा बॉलिवूडमधून गायब होण्याचे कोणते अन्य कारण होते हे मात्र कधीच कोणाला कळले नाही.

‘मिड-डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महिमाच्या मते, ‘सिनेसृष्टीत अनुभवी अभिनेत्रींना डोळ्यासमोर ठेवून संहिता लिहिली जात नाही. त्यामुळे दुय्यम दर्जाच्या भूमिका करण्यापेक्षा घरी बसणे केव्हाही उत्तम आहे.’ ४४ वर्षीय महिमाने डार्क चॉकलेट या बंगाली सिनेमात शेवटचे काम केले होते. सर्वसामान्य भूमिका करण्यापेक्षा कोणत्याच भूमिका न करणे केव्हाही उत्तम असे महिमा म्हणाली.

लिएण्डर पेस, महिमा चौधरी

महिमाने ‘दाग- द फायर’, ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘धडकन’, ‘दिवानें’, ‘कुरूकक्षेत्र’, ‘ओम जय जगदीश’ आणि ‘दिल है तुम्हारा’ या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. महिमाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर टेनिसपटु लिअँडर पेससोबत ती रिलेशलशीपमध्ये होती. पण काही कारणांमुळे हे नात फार काळ टिकू शकले नाही. आपल्या ब्रेकअपबद्दल बोलताना महिमा म्हणाली की, ‘त्याच्या जाण्याने माझे आयुष्य फारसे बदलले नाही. उलट त्याच्या जाण्यानंतर मी एक व्यक्ती म्हणून अधिक समजुतदार झाले आणि मला वाटतं त्याने रीहा पिल्लेसोबतही तसेच केले.’

mahima with her daughter aryana
अभिनेत्री महिमा चौधरी आणि तिची मुलगी अरिआना

महिमाने नंतर २००६ मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी विवाह केला. महिमाला अरिआना ही आठ वर्षांची मुलगी आहे. २०१६ मध्ये महिमा आणि बॉबी वेगळे राहू लागले. पण दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही.