27 October 2020

News Flash

‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का?

शो संपल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांनी...

काही चित्रपटांची जादू ही वर्षानुवर्षे कायम असते. ३२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक कीर्तीचा क्रिकेटमधील देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असो ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट या सर्वाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. या चित्रपटाचं आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं खास कनेक्शन आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला ५० आठवडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. चित्रपटाच्या ‘गोल्डन ज्युबिली’चा शो खूप गाजला. त्यावेळी बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार उपस्थित होते. शो संपल्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्यासोबत आवर्जून फोटो काढला.

छायाचित्र सौजन्य- दिलीप ठाकूर

आणखी वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक येणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..

हा चित्रपट आजची पिढीही आवडीने पाहते आणि त्यांनादेखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत. जेव्हा पुण्याच्या प्रभातला ३ रुपये फर्स्ट क्लास आणि ५ रुपये बाल्कनीला तिकीट होते तेव्हा ३ कोटीचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हेच गणित आज लावले तर शंभर कोटीच्या घरात पोहोचेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 12:22 pm

Web Title: there is a special connection between dilip kumar and marathi movie ashi hi banva banvi ssv 92
Next Stories
1 सुबोध भावे निर्मित पहिली मालिका ‘शुभमंगल ऑनलाइन’; अशी असेल कथा..
2 ‘जर अनुराग दोषी असेल तर…’, तापसी पन्नूचे मोठे विधान
3 “फिल्म सिटी म्हणजे कॉल सेंटरची इमारत नाही”; योगी आदित्यनाथ यांना दिग्दर्शकाचा टोला
Just Now!
X