News Flash

PHOTOS: सेलिब्रिटी किड्सची दिवाळी

शाहिदने पोस्ट केला मिशाचा फोटो

पारंपरिक वेशभुषेत मिशा आणि तैमुर

सध्या करिना कपूर, सैफ अली खान, शाहिद कपूर या सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांचीच चर्चा जास्त आहे. या चिमुकल्या सेलिब्रिटी किड्सना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच उत्सुक असतात. सैफ- करिनाचा तैमुर आणि शाहिद- मीराची मिशा यांचे दिवाळी साजरा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळीच आजी बबीताच्या घरातील तैमुरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तर संध्याकाळी शाहिदने मिशाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमध्ये पारंपरिक कपड्यांमध्ये मिशा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. तिच्यामागे फुलांची रांगोळीदेखील पाहायला मिळतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहिदने लिहिलं की, ‘माझ्या चिमुकल्या परीसोबत काढलेली ही फुलांची रांगोळी.’ दिवाळीच्या निमित्ताने मिशाला पारंपरिक वेशभुषेत पहिल्यांदाच पाहिलं गेलं.

वाचा : …तर ‘२.०’मध्ये रजनीकांतऐवजी आमिर दिसला असता 

दुसरीकडे सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुरची ही पहिली दिवाळी आहे. पांढरा कुर्ता आणि पायजम्यातील तैमुरच्या या फोटोंवरून कोणाचीच नजर हटणार नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. करिना आणि सैफचा हा छोटा नवाब अजून वर्षभराचाही झाला नाही. त्याचे फोटो टिपण्यासाठी नेहमीच फोटोग्राफर्स खूप उत्सुक असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 8:36 pm

Web Title: these celebrity kids made the most out of the festival of lights
Next Stories
1 …तर ‘२.०’मध्ये रजनीकांतऐवजी आमिर दिसला असता
2 ‘तिची’ शेवटची इच्छा शाहरुख पूर्ण करणार?
3 प्रेमाची नाती फार गुंतागुंतीची असतात- दीपिका पदुकोण
Just Now!
X