‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट तिची स्वतंत्र ओळख बनवण्यात यशस्वी झाली. ‘हायवे’, ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून दमदार अभिनय सादर करत आलियाने अनेकांचीच मनं जिंकली. आलिया अगदी नवोदित कलाकारंपासून ते बॉलिवूडच्या किंग खान पर्यंत अनेक कलाकारांसोबत काम करताना दिसत आहे. विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करत ती सध्या चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रातील करिअरच्या अचूक वाटेवर असलेली आलिया तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. असे असले तरीही हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याने अलियासह चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिया भट्टसोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेता इमरान हाश्मीला विचारण्यात आले होते. पण इमरानने मात्र या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, या दोन्ही कलाकारंमध्ये काही रागरुसवे आहेत तर तसे अजिबात नाही. या चित्रपटासाठी विचारण्यात आलेल्या भूमिकेसाठी इमरानला आलियासोबत रोमान्स करायचा होता. ही कथानकाची गरज होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण आलिया नात्याने इमरानची बहिण लागत असल्याने त्याने या भूमिकेसाठी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या इमरान त्याच्या ‘राज रिबूट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्यामुळे त्याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. म्हणून, अभिनेता इमरान हाश्मीने रसिकांना चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. ‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’ या चित्रपटात इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. यावेळी इमरान हाश्मी बरोबर दाक्षिणात्य सिनेमांची अभिनेत्री कृती खरबमदाही दिसणार आहे. तर ‘लव्ह गेम्स’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलेला अभिनेता गौरव अरोडाचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2016 रोजी प्रकाशित
..आलियासोबत काम करण्यास या अभिनेत्याचा स्पष्ट नकार
अलियासोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेता इमरान हाश्मीला विचारण्यात आले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 15-09-2016 at 12:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This actor said no to share screen with alia bhatt