News Flash

‘हा’ आहे बॉलिवूडचा सर्वांत महागडा अभिनेता; एका जाहिरातीसाठी घेतो इतके कोटी रुपये मानधन

एखाद्या सेलिब्रिटीला दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

कलाकाराची चाहत्यांमध्ये असलेली प्रसिद्धी, त्याचं अभिनय आणि एकंदर करिअरचा आलेख पाहून त्यानुसार मानधन वाढवले जाते. बॉलिवूडमध्ये सध्या एक असा कलाकार आहे, जो फक्त जाहिरातीसाठीसुद्धा कोट्यवधी रुपये मानधन घेतो. या अभिनेत्याने मानधनाचा विक्रमच मोडला आहे. एका स्मार्टफोन ब्रँडच्या जाहिरातीसाठी या अभिनेत्याने तब्बल सात कोटी रुपये घेतले आहेत. या जाहिरातीचं शूटिंग तीन ते पाच दिवस होणार असल्याने, प्रत्येक दिवसागणिक त्याने सात कोटी रुपये घेतले आहेत.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान आहे. चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता सलमान जाहिरातविश्वातही वरचढ ठरतोय. नुकतीच त्याने स्मार्टफोन ब्रँडच्या जाहिरातीची ऑफर स्वीकारली आहे. त्यासाठी त्याला प्रत्येक दिवसाला सात कोटी रुपये देण्यात येत आहेत. ब्रँडच्या विश्वात एखाद्या सेलिब्रिटीला दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

फक्त याच ब्रँडच्या जाहिरातीसाठी नाही तर इतर जाहिरातींसुद्धा सलमान सर्वाधिक रक्कम मानधन म्हणून घेतो. कलाविश्वात असलेल्या स्टारडममुळेच सलमानला इतके मानधन मिळत आहे. लोकप्रियतेनुसार कलाकाराला जाहिरातीसाठी मानधन दिले जाते. सलमानच्या तुलनेत इतर कलाकारांना तीन ते चार कोटी रुपये मानधन दिले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 11:04 am

Web Title: this actor takes 7 crore for brand endorsement ssv 92
Next Stories
1 अक्षय कुमारनं करून दाखवलं; जिथून हाकलण्यात आलं तिथंच घेतलं घर
2 Holi 2020 : ‘या’ गाण्यांशिवाय होळीचा रंग आहे फिका!
3 पुरुषांनी महिलांची कामं करावीत, मगच त्यांना मानते – रविना टंडन
Just Now!
X