30 September 2020

News Flash

अभिनेत्रीला लागलं ल्युडोचं वेड; चाहत्यांसोबत ऑनलाइन बसली खेळत

आवडत्या सेलिब्रिटीसोबत ल्युडो खेळायची संधी चाहत्यांना मिळाल्याची ही पहिलीच वेळ असेल.

लॉकडाउनमध्ये घरी बसून काय करावं असा प्रश्न अनेकांनाच पडला असेल. शूटिंगला परवानगी जरी मिळाली असली तरी सरकारने काही नियम आखून दिले आहेत. त्यामुळे अजूनही बरेच कलाकार घरीच वेळ व्यतीत करत आहेत. अशातच ऑनलाइन गेमिंगचंही प्रचंड वेड वाढलंय. त्यातही ल्युडोची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहायला मिळते. एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीलाही या गेमची भुरळ पडली आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत सापशिडीची पाटी आणि त्यासोबत असणाऱ्या रंगीबेरंगी सोंगट्या आपण पाहत आलो. मात्र, आता हा गेम मोबाईलवरही खेळता येतो आणि या खेळाचे वेड आता चक्क बॉलिवूड कलाकारांनाही लागले आहे. ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्री कियारा अडवाणी हा खेळ तिच्या चाहत्यांसोबत ऑनलाइन खेळत होती. या तीन चाहत्यांची निवड कियारानेच केली होती. चाहत्यांना आवडत्या सेलिब्रिटीसोबत ऑनलाइन ल्युडो खेळायची संधी मिळाल्याची ही पहिलीच वेळ असेल. यासंदर्भातील फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता.

आणखी वाचा : ‘रिलेशनशिप स्टेटस’ विचारणाऱ्या चाहत्याला इलियानाचं भन्नाट उत्तर

कियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे. ती अक्षय कुमारसोबत ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातही भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 5:10 pm

Web Title: this famous bollywood actress played online ludo with fans ssv 92
Next Stories
1 Video : उद्धव ठाकरे यांच्या ‘एरियल फोटोग्राफी’तून साकार झालं ‘विठ्ठला’
2 ‘या’ कारणामुळे जॅकलीन सलमानच्या फार्म हाऊसवरुन मुंबईला परतली…
3 ‘त्याने प्रपोज केलं पण, नंतर…’; रिचा-अलीची Lovestory
Just Now!
X