सध्या सोशल मीडियावर ‘ही चाल तुरू तुरू’ या गाण्याचे एक धम्माल व्हर्जन व्हायरल झालेले दिसत आहे. अभिनेत्री मिथाली पालकरने हे गाणे गायले असून, यामध्ये तिने प्लॅस्टिकचा कप वापरून धरलेला ठेका अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय, तिने हाताने टेबल वाजवत गाण्यात एकच धम्माल आणली आहे. या हटके व्हिडिओला सध्या नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते आहे.