28 February 2021

News Flash

जबरा फॅन! चाहतीमुळे शाहरुखला मिळाली चंद्रावर जमीन

शाहरुख कायम चाहत्यांसोबत नम्रपणे वागतो

पडद्यावरील रोमॅण्टीक अंदाजामुळे लाखो तरुणींच्या हृदयाची धडधड असलेल्या शाहरुखचा चाहता वर्ग काही कमी नाही. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याची लोकप्रियता अफाट आहे. शाहरुखदेखील कायम आपल्या चाहत्यांसोबत नम्रपणे वागत असतो. त्यामुळे त्याच्याविषयीचं प्रेम आणि आदर चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो. विशेष म्हणजे त्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. शाहरुखवर असलेल्या प्रेमापोटी त्याच्या एका चाहतीने त्याच्यासाठी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामधील एक महिला शाहरुखची खूप मोठी चाहती असून ती शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवशी त्याच्यासाठी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी करते. तिने 37.50. अमेरिकी डॉलर्सला एक एकर जमीन खरेदी केली आहे. विशेष म्हणजे शाहरुख त्याच्या या चाहतीला भेटलादेखील आहे.

वाचा : हर्मन बावेजाने सांगितलं प्रियांका चोप्राशी ब्रेकअप करण्यामागचं कारण

दरम्यान, शाहरुख या फोन, इमेलच्या माध्यमातून सतत या चाहतीच्या संपर्कात असतो. तसंच शाहरुखसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीसाठी त्याला लूनार रिपब्लिक सोसायटीतर्फे (Lunar Republic Society) प्रत्येक वर्षी एक प्रमाणपत्र देण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 9:55 am

Web Title: this indian actor gets land on the moon as birthday gift every year ssj 93
Next Stories
1 हॉलिवूड चित्रपटातील ‘तो’ सीन ब्लर केल्यामुळे फरहान अख्तरची आगपाखड
2 शतक महोत्सवी नाट्य संमेलनालाही राष्ट्रपती राजवटीचा फटका?
3 ‘विक्की वेलिंगकर’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X