News Flash

Yuvraj and Hazel Keech Wedding: युवराजसाठी ‘ये इश्क नही था आसां…’

अशी सुरु झाली होती युवी-हेजलची प्रेमकहाणी

युवराज सिंग, हेजल किच

बॉलिवूड आणि क्रीडा विश्व यांचे खूप जुने नाते आहे. बॉलीवूड कलाकार आणि क्रीडा खेळाडूंमध्ये आजवर अनेक जोड्या पाहावयास मिळाल्या. वर्षाभरापूर्वीच हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसराशी विवाह केला. त्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा अनुष्का शर्माला डेट करत आहेत. आता युवराज सिंग आणि हेजल कीच हीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, हे दोघेही प्रेमबंधनात नेमके अडकले कसे याबाबतच सध्या अनेकांच्या मनात कुतुहल आहे.

वाचा: युवराज सिंगच्या लग्नात विराट-अनुष्का करणार खास घोषणा

तसे पाहिले तर हेजलची मनधारणा करण्यासाठी युवराजला खुपच प्रयत्न करावे लागले होते. हेजलने इतक्या सहजासहजी युवीला होकार दिलेला नाही. फक्त एका ‘कॉफी डेट’वर येण्यासाठी हेजलने तीन वर्षांची वेळ घेतली होती. सलग तीन वर्ष युवराज हेजलला ‘कॉफी डेट’वर नेण्यासाठी विचारत होता. पण, हेजल मात्र काही केल्या तयार होत नव्हती. त्यामुळे हा प्रेमाचा प्रवास युवराजसाठी काहीसा कठिण होता असंच म्हणावं लागेल. पण, ते म्हणतात ना ‘ये इश्क नही आसां..बस इतना समझलो इग आग का दर्या है और तैरके जाना है’ ही ओळ युवीला पूर्णपणे लागू आहे. या प्रेमाच्या सागरात सर्व अडथळे दूर करत युवीने सरतेशेवटी हेजलचे मन जिंकलेच.

हेजल ‘कॉफी डेट’साठी युवीला सरसकट नकार देत नव्हती. पण, नेमकं डेटवर जाण्याच्याच दिवशी ती तिचा फोन बंद करत होती. हे प्रकरण असेच तीन वर्षांपर्यंत सुरु राहिले. पण ‘पंजाब दा पुत्तर’ युवराजनेही माघार घेतली नाही. तीन वर्षांनंतर कुठे हेजल आणि युवी कॉफीच्या निमित्ताने एकत्र भेटले. त्यांच्या या सुरेख नात्याची सुरुवात निखळ मैत्रीने झाली. त्यानंतर हळूहळू या दोघांमध्येही गप्पांचा ओघ वाढला आणि बऱ्याच दिवसांनंतर युवीने हेजलला डेटवर नेले. सोशल मीडियावरही हेजलने युवराजला बराच काळ ताटकळत ठेवले होते.

वाचा: युवराजने उलगडले दीपिका आणि किम सोबतचे त्याचे गुपित

एका मुलाखतीमध्ये हेजलने म्हटले होते की, ‘मी सुद्धा युवराजवर कधी प्रेम करु लागले हे माझे मलाच कळले नाही. पण ज्यावेळी युवराजने त्याच्या प्रेमाची कबुली दिली त्यावेळी मलाही माझ्या भावनांचा ठाव घेण्यात यश आलं’. युवी आणि हेजलने फार वेळानंतर एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली, त्यांचे हे नाते कुटुंबियांसमोर मांडले आणि त्यानंतर अधिकृतपणे या नात्याची घोषणा करत हेजल आणि युवीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. काहीशा धीम्या गतीने सुरु झालेल्या हेजल किच आणि युवराजच्या लग्नाबद्दल सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युवराज सिंगच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून पाहुण्यांची ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे लग्नसोहळ्याची एकंदर रंगत पाहता विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत युवी आणि हेजलचा हा लग्नसोहळा रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:06 am

Web Title: this is how yuvraj singh and hazel keechs love story started
Next Stories
1 सेलिब्रिटी क्रश: ‘.. आणि माझा पोपट झाला’
2 शिल्पा शेट्टीच्या सामान्य ज्ञानावरुन #ShilpaShettyReviews ट्रेंडमध्ये
3 Yuvraj Singh: युवराजने उलगडले दीपिका आणि किमसोबतचे त्याचे गुपित
Just Now!
X