News Flash

‘तुला पाहते रे’मध्ये राजनंदिनीची एण्ट्री कधी होणार?; शिल्पा तुळस्कर म्हणते..

मालिकेत राजनंदिनीचं रहस्य उलगडणार का?

tula pahate re
'तुला पाहते रे'

‘झी मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचं अभिनय या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच नवीन घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातच विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एण्ट्री कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. यासंदर्भात आता खुद्द अभिनेत्री शिल्पा तुळस्करने खुलासा केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पानं सांगितलं, ‘मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री नेमकी कधी होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार.’ परंतु, या पलीकडे राजनंदिनीच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती द्यायला शिल्पानं नकार दिला.

 

shilpa-tulaskar- शिल्पा तुळस्कर

वाचा : इम्तियाज अलीच्या चित्रपटात सारा-कार्तिकची जोडी

‘तुला पाहते रे’ मालितेच्या शीर्षकगीतात शिल्पाची झलक पाहायला मिळते. पण तिची नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ती विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. पण आता राजनंदिनीचं रहस्य काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंद खोलीचं काय रहस्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 12:19 pm

Web Title: this is what shilpa tulaskar reacted on her entry in tula pahate re
Next Stories
1 बलात्काराचा आरोप असलेले आलोक नाथ #MeTooवरील चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत
2 हेरा फेरी ३ : खळखळून हसवायला येतंय हास्याचं त्रिकूट
3 Confirmed : इम्तियाज अलीच्या चित्रपटात सारा-कार्तिकची जोडी
Just Now!
X