News Flash

..म्हणून अजय देवगण लिफ्टचा वापर करायला घाबरतो

यामागचं कारण त्याने स्वत: सांगितलं आहे.

अजय देवगण

एखादी अनपेक्षित घटना किंवा अपघात यामुळे आयुष्यभर आपल्या मनात त्या गोष्टीची भीती राहते. अभिनेता अजय देवगण जरी ऑनस्क्रीन विविध स्टंट्स करताना दिसत असला तरी खऱ्या आयुष्यात तो लिफ्टमध्ये चढण्यास घाबरतो. यामागचं कारण त्याने स्वत: सांगितलं आहे.

सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात त्याने अभिनेत्री तब्बू आणि रकुल प्रीत यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी त्याने लिफ्टला घाबरण्यामागचं कारण सांगितलं. ‘एकदा मी आणि माझा मित्र लिफ्टमध्ये होतो. तेव्हा अचानक ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून कोसळली. आम्ही दोघं जवळपास दीड-दोन तास लिफ्टच्या आत अडकलो होतो. त्या घटनेपासून मला लिफ्टमध्ये पाय ठेवायला पण भीती वाटते. मी कुठेही कधीच लिफ्टचा वापर करत नाही. पायऱ्या चढण्याचा पर्यायच माझ्यासाठी उत्तम आहे,’ असं त्याने सांगितलं.

अजयचा ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अजयने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 10:55 am

Web Title: this is why ajay devgn is scared about lift
Next Stories
1 नृत्यभरारी आभाळाएवढी..
2 सिनेमा आणि समलैंगिकता
3 चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल..
Just Now!
X