26 February 2021

News Flash

..अन् ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रोहित पवारांच्या डोळ्यात आलं पाणी

'चला हवा येऊ द्या'मध्ये रोहित पवार, पंकजा मुंडे आणि सुजय विखे पाटील यांची हजेरी

कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत गेल्या सहा वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. येत्या १४ ते १६ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमात राजकीय हास्यकारंजे उडणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत.

या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचं दुःख सांगणारं पत्र सादर केलं आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांचे डोळे पाणावले. या पत्राला हे तीनही नेते काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना कार्यक्रमात पाहायला मिळेल.

आणखी वाचा : “रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो”; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पंकजांचा टोला

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतील ‘पत्रास कारण की..’ हा भाग लोकांना प्रचंड आवडतो. एखादा विषय किंवा व्यक्ती घेऊन पत्र लिहिलं जातं. त्या पत्राचं वाचन पोस्टमनकाकांच्या भूमिकेतील विनोदवीर सागर कारंडे करतो.

‘चला हवा येऊ द्या’चा हा विशेष भाग सोमवार १४ ते बुधवार १६ डिसेंबर रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 3:53 pm

Web Title: this is why rohit pawar got emotional on the show of chala hawa yeu dya ssv 92
Next Stories
1 करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायूचा झटका, काही दिवसांपूर्वी झाला होता करोना
2 Video: सलमानने साजरा केला बॉडीगार्डचा वाढदिवस, पण…
3 येत्या दोन वर्षात रणवीर सिंग घेऊन येणार ७ नवे चित्रपट?
Just Now!
X