या मे महिन्यात झी मराठी साजरा करत आहे ‘मनोरंजनाचा अधिक मास’ ज्यामध्ये या महिन्यात रविवारीही प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे ज्यात त्यांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
झी मराठीवरील सर्वच मालिका आणि त्यातील कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत. सायंकाळच्या ६.३० च्या ‘होम मिनिस्टर’ पासून ते रात्री ९ वाजता प्रसारित होणा-या ‘काहे दिया परदेस’ पर्यंत सर्वच दैनंदिन मालिका, त्याचं कथानक, त्यात घडणा-या गोष्टी याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायमच उत्सुकता असते. झी मराठीवरील याच लोकप्रिय मालिकां या महिन्यात प्रेक्षकांना रविवारीही बघायला मिळतील. येत्या १ मेपासून मनोरंजनाचा हा अधिकमास सुरू होणार असून यासोबतच प्रेक्षकांसाठी एका खास स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये ६.३० वा. ते रात्री ९ दरम्यान प्रसारित होणा-या ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ आणि ‘काहे दिय परदेस’ या मालिकांमध्ये दर अर्ध्या तासाला त्या भागाशी संबंधित एक प्रश्न विचारला जाणार आहे. या प्रश्नांची उत्तरे 1800 103 5519 आणि 1800 103 5523 या क्रमांकावर फ्री मिस्ड कॉलद्वारे देता येतील. या प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-या निवडक भाग्यवान विजेत्यांना ९९९९ रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय रविवारी विचारल्या जाणा-या सर्वच प्रश्नांची योग्य उत्तरे देणा-या निवडक भाग्यवान विजेत्यांना एक लाख एक हजार एकशे अकरा रूपयांचं बंपर बक्षीस जिंकता येणार आहेत. याशिवाय प्रत्येक आठवड्याच्या निवडक भाग्यवान विजेत्यांना झी मराठीच्या कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार आहे हे विशेष.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2016 11:00 am