News Flash

हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसणारा ‘तो’ बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

विराट कोहली, अमित मिश्रा

सध्याच्या घडीला विराट कोहली हा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याची हेअरस्टाईल, कपडे, फॅशन अशा अनेक गोष्टी तरुणवर्ग कॉपी करताना दिसतो. पण, मथुरामध्ये एक तरुण असाही आहे, जो हुबेहूब विराटसारखाच दिसलो. मथुराच्या अमित मिश्राला पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

शरीरयष्टी, उंची, चेहरा हुबेहूब विराटसारखाच. अमितचे मित्र त्याला विराट या नावानेच हाक मारतात. उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथे त्याचा जन्म झाला असून मथुराच्या जीएलए विद्यापीठात त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतले आहे. अमितचे वडील भाजपचे नेते आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अमितला अभिनय क्षेत्रात रस असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्याच्या घडीला त्याला काही जाहिरातीसुद्धा मिळाल्या आहेत.

वाचा : आणखी एका सेलिब्रिटीशी कपिलने घेतला पंगा

अमितचे फेसबुकवरील फोटो पाहून विराटची स्टाईल तोसुद्धा कॉपी करत असल्याचे दिसते. विराटकडून आपल्याला प्रेरणा मिळत असून त्याला भेटण्याची इच्छा अमितने व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:10 am

Web Title: this youth looks exactly like virat kohli and is soon going to enter bollywood
Next Stories
1 VIDEOS : असा रंगला भारती आणि आश्काचा मेहंदी सोहळा
2 आणखी एका सेलिब्रिटीशी कपिलने घेतला पंगा
3 कास्टिंग काऊचबद्दल सलमान म्हणतो..
Just Now!
X