News Flash

सलमानसोबतच्या ‘या’ लहानगीला ओळखलंत का?; ‘दबंग ३’मधून करतेय पदार्पण

#FlashbackFriday : एका प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शक व निर्मात्याची ही मुलगी आहे.

ओळखा पाहू या मुलीला..

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता अर्थात सलमान खान हा अनेकांसाठी ‘गॉडफादर’ ठरला आहे. बऱ्याच कलाकारांना त्याने आजवर बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. त्यातच आता आणखी एका स्टारकिडची भर पडणार आहे. ती म्हणजे अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर. सई आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे सईच्या लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती सलमानसोबत पाहायला मिळतेय. फोटोतली हीच लहान मुलगी आता मोठी झाली असून सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.

विशेष म्हणजे, या फोटोमध्ये दिसणारा सलमान अजूनही तसाच आहे. ‘दबंग ३’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सईच्या पदार्पणाची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुपेरी पडद्यावर सलमान व सईची केमिस्ट्री कशी असणार, हे पाहण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.

आणखी वाचा : ‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन ऐश्वर्याने पटकावला होता ‘मिस वर्ल्ड’चा किताब

‘दबंग ३’चे दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. येत्या २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान, सईसोबतच सोनाक्षी सिन्हाचीही भूमिका आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता किचा सुदीप यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 2:31 pm

Web Title: throwback picture of salman khan with his dabangg 3 co star saiee manjrekar ssv 92
Next Stories
1 T20 World Cup 2020 : करिना कपूरच्या हस्ते विश्वचषकाचं अनावरण
2 ‘बाळासाहेब! तुम्ही ज्या मराठी मुलांसाठी भांडलात त्यांना कामच करायचं नाही’
3 ‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन ऐश्वर्याने पटकावला होता ‘मिस वर्ल्ड’चा किताब
Just Now!
X