25 September 2020

News Flash

Thugs of Hindostan : …अन् प्रभुदेवामुळे साकार झाली ‘सुरैय्या’ – कतरिना

सुरैय्या या गाण्यात कतरिना बेली डान्स करताना दिसत आहे.

कतरिना कैफ, सुरैय्या

आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रदर्शित होणारा या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. अभिनेता आमिर आणि अमिताभ बच्चन या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार असून काही दिवसापूर्वी तिचं या चित्रपटातील ‘सुरैय्या’ हे गाणं प्रदर्शित झालं. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यासाठी कतरिनाला बरेच परिश्रम करावे लागल्याचं तिने सांगितलं आहे.

काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सुरैय्या’ या गाण्यामध्ये कतरिना वेगळ्या अंदाजात दिसत असून यात ती बेली डान्स करताना दिसत आहे. सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध डान्सर प्रभुदेवा यांनी केलं आहे. यासाठी प्रभूदेवा यांनी कतरिनाकडून प्रचंड मेहनत करुन घेतल्याचं तिने सांगितलं आहे. त्याचसोबत कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात तिने सुरैय्याला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे.

‘प्रभुदेवा हे उत्तम डान्सर आहेत हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण त्यासोबतच ते उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकही आहेत. ठग्समधील सुरैय्या या गाण्याच्या स्टेप बसविण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक स्टेप व्यवस्थित असावी याकडे त्यांचं लक्ष असायचं’, असं कतरिनाने सांगितलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘प्रभुदेवा यांच्या नृत्याची मी फार पुर्वीपासूनच चाहती आहे. त्यांचं ‘मुकाबला’ हे गाणं माझं सर्वात आवडत गाणं आहे त्यामुळे माझ्या आवडत्या प्रशिक्षकाकडून नृत्याचे धडे गिरवणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे’.

दरम्यान, सुरैय्याच्यानिमित्ताने कतरिनाला पहिल्यांदाच प्रभूदेवासोबत काम करण्याची संधी मिळाली असून या गाण्यात कतरिनासोबत अभिनेता आमिर खानदेखील झळकला आहे. विजय कृष्ण दिग्दर्शित ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 9:07 am

Web Title: thugs of hindostan katrina kaif aamir khan dance practice prabhu deva video
Next Stories
1 अलोक नाथ यांना दिलासा नाहीच!
2 खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
3 चित्र रंजन : पोरकट खेळ सारा
Just Now!
X