News Flash

‘ती परत आलीये’मधील कलाकारांची फौज आहे प्रेक्षकांच्या ओळखीची

मालिकेतील चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचेच आहेत

ti parat aaliye, ti parat aaliye cast,

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. ही मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती कि या मालिकेत कोणते कलाकार असणार आहेत. प्रोमोमध्ये फक्त अभिनेते विजय कदम प्रेक्षकांच्या भेटीस आले पण बाकी कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच होती. मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्यातील कलाकार देखील प्रेक्षकांच्या समोर आले आणि हे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचेच आहेत.

‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मालिका विश्वात काम केलेल्या काही कलाकारांना संधी दिली आहे. विजय कदम हे सर्वांच्याच ओळखीचे अभिनेते आहेत. मध्यवर्ती भूमिकेत त्यांचा चेहरासमोर ठेवून इतर कॅरेक्टर्स अत्यंत चांगल्या प्रकारे कथानकात गुंफल्या आहेत. यातील सर्वच व्यक्तिरेखांना समान महत्त्व आहे. यासाठी कॅरेक्टरला न्याय देऊ शकेल अशा कलाकारांची निवड केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या मालिकेतील तरुण मुलांमध्ये सायली नावाचं कॅरेक्टर कुंजिका काळवींट साकारत आहे. तिने याआधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. नचिकेत देवस्थळीनं विक्रांत साकारत आहे. यानं ‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांसोबतच ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये काम केलं आहे. श्रेयस राजे याने देखील या आधी २ मालिकांमध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका काहे दिया परदेस या मालिकेतील समीर खांडेकर हणम्याची भूमिका साकारतोय. टीकारामची भूमिका प्रथमेश विवलकर करतोय तसेच अनुजाची भूमिका अभिनेत्री वैष्णवी करमरकर हे देखील या आधी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. मँडीच्या भूमिकेतील तेजस महाजन ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मधून आला आहे. त्याची ही पहिलीच मालिका आहे. या सर्वांची निवड ऑडिशनद्वारे करण्यात आली.

सध्या या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि अभयचा खून झाला असून तो खून कोणी केला हे अद्याप कळलं नाही आहे. अभयच्या खुनामागे कोण आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2021 6:57 pm

Web Title: ti parat aaliye serial star cast avb 95
Next Stories
1 ‘तैमूर भारतासाठी सुवर्ण पदक आणेल’, तैमूरची एण्ट्री पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल
2 ४२ वर्षांची शमिता शेट्टी पडली राकेश बापटच्या प्रेमात?
3 …म्हणून प्रार्थना बेहेरेने केले छोट्या पडद्यावर पदार्पण
Just Now!
X