News Flash

Confirm : टायगर श्रॉफ आणि दिशाचा ब्रेकअप

दिशा आणि आदित्य ठाकरे यांच्यामधील नात्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या

अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात असलेल्या नात्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दिशा आणि टायगरने त्यांच्या नात्याची अद्याप कबुली दिलेली नाही. परंतु ते दोघे नेहमी डिनर डेट किंवा लन्चसाठी एकत्र जाताना दिसत असतात. परंतु आता त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यापासून टायगर श्रॉफ आणि दिशा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या दोघांनी मिळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांसाठी हा एक धक्काच आहे. दिशा आणि टायगर पुन्हा एकत्र येणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

काही दिवासांपूर्वी दिशा आणि आदित्य ठाकरे यांच्यामधील नात्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. परंतु दिशा आणि टायगर यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचे कारण आदित्य नसून काही वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दिशा आणि टायगरमध्ये मतभेद देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. आता त्या दोघांनी मित्र-मैत्रीणे प्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 6:34 pm

Web Title: tiger shroff and disha patani breakup avb 95
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांनी शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो
2 शनाया करते ‘या’ अभिनेत्याला डेट, पण लग्नाबद्दल म्हणते…
3 ‘कबीर सिंग’ ठरतोय सुपरहिट! तिसऱ्याच दिवशी गाठला ५० कोटींचा पल्ला
Just Now!
X