22 September 2020

News Flash

टायगर पुन्हा होणार ‘बागी’, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

टायगर श्रॉफने सोशल मीडियावर 'बागी 3' चा पोस्टर शेअर करत त्याच्यासोबत रिलीज डेट जाहीर केली आहे

अभिनेता टायगर श्रॉफ ‘बागी 3’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. टायगर श्रॉफने आज सकाळी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘बागी 3’ मध्येही टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री कोण असणार आहे हे अद्याप ठरलेलं नाही. टायगर श्रॉफने सोशल मीडियावर ‘बागी 3’ चा पोस्टर शेअर करत त्याच्यासोबत रिलीज डेटही जाहीर केली आहे.

‘बागी 2’ रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी ‘बागी 3’ ची घोषणा केली होती. रिलीज डेट जाहीर करताना टायगरने लिहिलं आहे की, ‘राऊंड 3 आता सुरु…6 मार्च 2020 ला चित्रपट रिलीज होईल’. अहमद खान ‘बागी 3’ चं दिग्दर्शन करणार असून साजिद नाडियाडवाला निर्माता असणार आहेत.

याआधी सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, अहमद खानला टायगरने ‘बागी 3’ साठी विशेष मेहनत घेणं अपेक्षित आहे. चित्रपटासाठी रिसर्च करत असताना सीरियामध्ये चांगले ट्रेनिंग कॅम्प असल्याची माहिती त्याला मिळाली. यामुळे अहमद खानने टायगरला नोव्हेंबर महिन्यात सीरियामधील ट्रेनिंग कॅम्पमध्ये पाठवण्याचं ठरवलं आहे. तिथे टायगरला M16, AT4 आणि रॉकेल लाँचर्ससाऱख्या शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

दरम्यान ‘बागी 3’ मध्ये सारा अली खानची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या पदरात अनेक चित्रपट पडल्याचं पाहायला मिळत आहे. ‘केदारनाथ’नंतर तिचा आगामी ‘सिम्बा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटाव्यतिरिक्त तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून साजिद नाडियादवालाच्या आगामी ‘बागी ३’ साठीदेखील तिला विचारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 12:50 pm

Web Title: tiger shroff announces release date of baaghi 3
Next Stories
1 शाहरुखच्या ‘झिरो’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
2 ट्रेलरही प्रदर्शित झाला, तरी कामाचे पैसे मिळाले नाही, ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील अभिनेत्याची नाराजी
3 अक्षय, करण, अजयनं पंतप्रधान मोदींपुढे मांडल्या चित्रपटसृष्टीतील समस्या
Just Now!
X