07 March 2021

News Flash

लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहतीला टायगर श्रॉफचं विचारपूर्वक उत्तर

टायगरने दिलेल्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यात काय चालू आहे हे पाहण्यापासून ते त्याला थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाला आहे. सेलिब्रिटीसुद्धा विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या व त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यादरम्यान एका चाहतीने टायगरला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावर टायगरने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

‘माझ्याशी लग्न कर आणि युकेला राहायला ये’ असं त्या चाहतीने टायगरला विचारलं. त्यावर टायगर विचारपूर्वक उत्तर देत म्हणाला, ‘कदाचित आणखी काही वर्षांनी, जेव्हा मी तुझी व्यवस्थित साथ देऊ शकेन. तोपर्यंत खूप काही शिकायचंय आणि कमवायचंय.’

आणखी वाचा : कंगनाच्या ट्विटला दिलजितचं मजेशीर उत्तर; सांगितलं पूर्ण वेळापत्रक

टायगरने यादरम्यान इतरही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आवडता अभिनेता असल्याचं टायगरने यावेळी सांगितलं. अल्लू अर्जुनसारखा सर्वोत्तम डान्स करता यावा अशीही इच्छा त्याने व्यक्त केली.

टायगरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘हिरोपंती’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. त्यानंतर ‘गणपत’ हा त्याचा आणखी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 1:24 pm

Web Title: tiger shroff has the most humble answer to a user who asks him to marry her ssv 92
Next Stories
1 वादग्रस्त वक्तव्यामुळे युवराज सिंगच्या वडिलांची ‘या’ चित्रपटातून हकालपट्टी
2 नेहा कक्करने खाल्ली कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी, व्हिडीओ व्हायरल
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रजनीकांत यांना दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा, म्हणाले…
Just Now!
X