14 December 2017

News Flash

…म्हणून ‘साहो’च्या सेटवर सुरक्षा वाढवली

प्रभास सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 8:24 PM

प्रभास

संपूर्ण देशातील चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता प्रभास सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. पण, या सर्व कारणांमध्येही त्याच्या आगामी चित्रपटाच्याच चर्चा सर्वात जास्त रंगत आहेत. त्यामागचे कारणही तसंच आहे. ‘बाहुबली २’ला मिळालेल्या यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. ज्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या.  बाहुबली प्रभासच्या ‘साहो’ सिनेमाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल नुकतेच संपले. लवकरच या सिनेमाचे दुसरे शेड्युलही सुरू होईल. पण हे चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी सेटवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण आता बाहुबलीला पाहण्यासाठी रोज तिथे हजारो लोक येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास जेव्हा ‘साहो’च्या सेटवर जातो तेव्हा तिथे त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड उडते. जेव्हा त्याच्या चाहत्यांना कळते की प्रभास जवळपास आहे तेव्हा ते त्याचे नावाने जोर जोरात ओरडू लागतात. बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासची क्रेझ वाढल्याचे दिसून येते. यामुळेच साहोच्या सेटवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सेटवर तर सुरक्षेत वाढ केलीच शिवाय त्याच्या खासगी सुरक्षेतही दुपट्टीने वाढ करण्यात आली आहे. ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यांना त्याचा सिनेमातील लूक लीक होऊ नये असे वाटते. म्हणूनच त्यांनी त्याच्या खासगी सुरक्षेतही वाढ केली आहे.

प्रभासने ‘बाहुबली’ सिनेमासाठी पाच वर्षे फार मेहनत घेतली. त्याची ही मेहनत संपूर्ण जगाने पाहिली. या सिनेमाने त्याला फक्त पैसाच दिला नाही, तर प्रचंड लोकप्रियताही मिळवून दिली. प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सायन्स फिक्शन सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे.

First Published on October 12, 2017 8:24 pm

Web Title: tight security on the sets of saaho as crowd want to see prabhas