30 May 2020

News Flash

PHOTOS : ‘सरस्वती’च्या सेटवर सरू-देविकाची ऑफस्क्रीन धम्माल

१२/१३ तास एकत्र काम केल्यानंतरही अशी जवळीक बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळत नाही.

तितिक्षा तावडे, जुई गडकरी

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये ‘सरस्वती’ या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेचाही समावेश होतो. मालिकेमधील सरू म्हणजेच तितिक्षा आणि देविका म्हणजेच जुई या ऑफस्क्रीन चांगल्या मैत्रिणी असून, त्या सेटवर सिन्सच्यामध्ये बरीच धम्माल करत असतात. तब्बल १२/१३ तास एकत्र काम केल्यानंतर सेटवर एकत्र राहूनही अशी जवळीक बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळत नाही.

वाचा : ”न्यूड’ होण्यास मला काहीच अडचण नाही’

मालिकेमध्ये सरू आणि देविका या दोघींच्या नात्यामध्ये जरी गैरसमज असले तरी देखील मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान या दोघीही सेटवर खेळी मेळीच वातावरण ठेवतात हे या फोटोमध्ये दिसून येते. या फोटोंना डिजिटल मीडियावर देखील बरेच लाइक्स मिळत आहेत. या फोटोंमध्ये जुई म्हणजेच देविका सरुच्या ठमीवर बसून मस्त सेटवर फेरफटका मारत असल्याचे दिसते. घरामधील सरस्वती आणि लक्ष्मी जेव्हा आनंदाने नांदते तेव्हा घर कसं छान आणि प्रसन्न राहतं, अस काहीसं हे फोटो बघून वाटते.

वाचा : ट्विटरवर ‘रेपिस्ट’ म्हणणाऱ्या तरुणीला अर्जुन कपूरचं सडेतोड उत्तर

‘सरस्वती’ मालिकेमध्ये सध्या राघवने सरूला वाड्यामधून बाहेर काढले आहे. पण, राघवच्या नकळत सरस्वती वाड्यामध्ये राहतेय. सरू वाड्यामध्ये राहत असल्याचे देविकाच्या मनाला अजिबात पटत नाही. पण, ती याविरोधात काही बोलत देखील नाही. सरू या वाड्यामध्ये निव्वळ मोठ्या मालकांचे रक्षण करण्यासाठी राहतेय.

दरम्यान, हे फोटो बघितल्यानंतर देविका आणि सरूच्या नात्यातील ही ऑफस्क्रीन मज्जा पडद्यावर बघायला मिळेल का ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2017 3:28 pm

Web Title: titeeksha tawde and jui gadkari offscreen chemistry on saraswati serial
Next Stories
1 ”न्यूड’ होण्यास मला काहीच अडचण नाही’
2 ट्विटरवर ‘रेपिस्ट’ म्हणणाऱ्या तरुणीला अर्जुन कपूरचं सडेतोड उत्तर
3 TOP 10 NEWS : सगळ्यांपासून दूर जाणार तैमुर; मनोरंजन क्षेत्रातील १० ठळक घडामोडी
Just Now!
X