गेल्या कित्येक वर्षांपासून अबाल-वृद्धांच्या मनावर राज्य करणारं कार्टून म्हणजे टॉम अँड जेरी. उंदीर आणि मांजराचा खेळ, त्यांच्यातील मस्ती आणि भांडणं या कार्टुनमध्ये दाखविण्यात आलं असून त्यातील टॉम( मांजर) व जेरी( उंदीर) या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर आजतागायत राज्य केलं आहे. विशेष म्हणजे हे कार्टुन आता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

टॉम अँड जेरी यांच्यावर आधारित हा चित्रपट ३ डी लाइव्ह अॅनिमेशन असून यात रिअर लाइफ वर्ल्डमध्ये टॉम आणि जेरी या दोन अॅनिमेटेड कॅरेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात अन्य कलाकारांसोबत टॉम व जेरी हे दोन अॅनिमेटेड पात्र उभी करण्यात आली आहेत.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली असून त्याच अंदाजात टॉम आणि जेरी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात न्युयॉर्कमधील एका आलिशान हॉटेलमध्ये भारतीय रीतीरिवाजानुसार एका लग्नसोहळ्याचं आयोजन केलं असतं. या सोहळ्यात अचानक जेरी पोहोचतो आणि धुमाकूळ घालतो. त्यामुळे जेरीला पळवून लावण्यासाठी हे या लग्नाची वेडिंग इव्हेंट प्लॅनर टॉमची नियुक्त करते. मात्र, या हॉटेलमध्ये टॉम आणि जेरीचा पकडापकडीचा खेळ सुरु होतो. ज्यामुळे लग्नाच्या कार्यात अनेक मजेशीर किस्से घडतात.

दरम्यान, या चित्रपटात क्लो ग्रेस मोरेट्ज, मायकेल पेन्या, रॉब डलेनी, कॉलिन जोस्ट आणि केन जेंग ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेलया या ट्रेलरने अनेकांची मनं जिंकली असून आतापर्यंत या ट्रेलरला २ लाख ३४ हजार ६९३ पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.