हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझ ‘मिशन इम्पॉसिबल ६’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. tmz.com च्या माहितीनुसार एका साहसदृष्याचे शूटिंग करताना टॉम क्रूझला दुखापत झाली. या दृष्यात टॉमला एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारायची होती. दोन इमारतींमधील अंतर जास्त असल्याने सुरक्षेसाठी दोर लावण्यात आला होता. टॉमच्या पाठीला हा दोर बांधण्यात आला होता. मात्र हा स्टंट करतानाच दोरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टॉम दुसऱ्या इमारतीच्या भिंतीला जाऊन धडकला. या दुर्घटनेत ५५ वर्षीय टॉम जखमी झाला आहे.
इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अकाऊंट्सवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. पोस्ट झाल्यानंतर अल्पावधीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय. दुखापत झाल्यानंतरही टॉमने हा स्टंट पुन्हा एकदा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्यांदाही तो यशस्वी होऊ शकला नाही. या व्हिडिओमध्ये टॉम इमारतीच्या भिंतीला धडकल्यानंतर स्वत:ला वर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. टॉमवर सध्या उपचार सुरु असून तो लवकरच बरा होईल अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.
https://www.instagram.com/p/BXxPWTbDaiq/
ख्रिस्तोफर मक्कवेरी दिग्दर्शित ‘मिशन इम्पॉसिबल ६’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात टॉम क्रूझ व्यतिरिक्त हेनरी कॅविल, रेबेका फर्ग्युसन, अँजेला बॅसेट आणि अॅलेक बाल्डविन यांच्याही भूमिका आहेत.