23 September 2020

News Flash

Top 10 News: ट्रोलिंगसंदर्भातील ट्विंकलच्या वक्तव्यापासून ‘राझी’च्या ट्रेलरपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण दहा घडामोडी

ट्रोलिंगसंदर्भातील ट्विंकलच्या वक्तव्यापासून 'राझी'च्या ट्रेलरपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

अभिनय क्षेत्राला बऱ्याच वर्षांपूर्वी रामराम केल्यानंतरही ट्विंकलचा कलाविश्वातील वावर मात्र कायम आहे. सध्या तिने आपला मोर्चा लेखनाकडे वळवला असून, विविध सदरं लिहिण्यासाठी ती योगदान देते. त्याशिवाय ट्विंकलच्या ट्विट्स आणि वक्तव्यांचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. अशाच एका वक्तव्यामुळे ट्विंकल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हे म्हणजे एखाद्या झुरळासारखं आहे, असं मत तिने मांडलं. एका कार्यक्रमादरम्यान ती बोलत होती.

ट्विंकलच्या या वक्तव्यासोबतच कलाविश्वास आणि सोशल मीडियावर आज सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टच्या आगामी ‘राझी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची. या ट्रेलरमधील आलियाच्या साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ११ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांनाच भावला. यासोबत मनोरंजन विश्वातील काही महत्त्वपूर्ण दहा घडामोडींचा आढावा घेऊयात..

सोशल मीडिया ट्रोल्सना अशाप्रकारे हाताळा, ट्विंकलचा सल्ला

Raazi Trailer: ‘वतन के आगे कुछ नहीं… मैं भी नहीं’

टॉपलेस झाल्यामुळे श्री रेड्डीवर बेघर होण्याची वेळ

आर. माधवनच्या मुलाने देशासाठी स्विमिंगमध्ये पटकावले पदक

‘हम साथ साथ है’मधील सलमानच्या सहकलाकाराला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याच्या धमक्या

या महिला गुप्तहेराने केले होते पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न

टायफॉइड झाल्याने दीपिकासोबतच्या या क्षणांना मुकणार रणबीर

‘ईडा पिडा टळो….’, सलमानसाठी अर्पिताने लिहिली भावूक पोस्ट

‘सोनम दी वेडिंग’, स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार सोनम कपूरचा शाही विवाहसोहळा

…म्हणून रिमीनं अभिनयापासून दूर जाण्याचा घेतला निर्णय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 8:03 pm

Web Title: top 10 entertainment news bollywood gossip twinkle khanna on social media trolling alia bhatt raazi trailer
Next Stories
1 त्या दोघींना ओळखलंत का?
2 टॉपलेस झाल्यामुळे श्री रेड्डीवर बेघर होण्याची वेळ
3 ऋषी कपूर बिग बींना म्हणतायत, ‘बच्चे की जान लोगे क्या?’
Just Now!
X