‘ले फोटो ले’ हे गाणे तुम्ही याआधी कधी ऐकले आहे का?…. नाही?… तर मग ऐका.., हे आहे, २०१९ मधील गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले गाणे. या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. गुगलने अलिकडेच या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप १० गाण्यांची यादी जाहिर केली. या यादीमध्ये नीलू रंगेली यांचे ‘ले फोटो ले’ हे गाणे पहिल्या क्रमांकावर आहे. तर रणू मंडल यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. नीलू रंगीलीने गुगलवर सर्वाधिक सर्च होण्याचा एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.

रेखा यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या साराची वरूण धवननं घेतली फिरकी

अतरंगी रणवीर दिसणार ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत

हे गाणे यूट्यूबवर जवळपास ११ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. यावरुन रसिकांमध्ये या गाण्याविषयी असलेली क्रेझ पाहायला मिळते. ‘ले फोटो ले’ हे एक राजस्थानी गाणे आहे. मेवारी ब्रदर्स यांनी गेल्या वर्षी चेतक कॅसेट्ससाठी या गाण्याची निर्मिती केली होती. सुरुवातीला या गाण्याची लोकप्रियता केवळ राजस्थान पुरतीच मर्यादित होती. परंतु यावर्षी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये नृत्यस्पर्धेदरम्यान हे गाणे वाजवले गेले. तेव्हापासून या गाण्याची लोकप्रियता वाढतच गेली. आणि आज नीलू रंगीलीने गुगलवर सर्वाधिक सर्च होण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

टॉप १० सर्च झालेली गाणी

  • ले फोटो ले
  • तेरी मेरी कहानी
  • तेरी मेरी प्यारी दो अखिया
  • वास्ते
  • कोका कोला
  • गोरी तेरी चुनरीया बा.. ला.. ला.. रे..
  • पल पल दिल के पास
  • लडकी आंख मारे
  • पायलीया बजनी लाडो पिया
  • क्या बात है