तरुणाचे भावविश्व मांडणाऱ्या अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या चित्रपटाला लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
करोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल. त्रिज्या चित्रपटात २५ वर्षांच्या तरुणाचे भावविश्व मांडण्यात आले आहे. या चित्रपटाने ‘एशियन न्यू टॅलेंट’, ‘ब्लॅक नाईट्स फिल्म फेस्टिव्हल’, आणि बांग्लादेश येथील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्वित्झर्लंड येथील चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाची दखल घेतली जाणे ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:44 am