विनोदवीर कपिल शर्माने बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. मात्र कधी काळी प्रेक्षकांना खळखळून हसविणारा हा शो टीआरपीच्या रेटिंगमध्ये घसरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कपिलसाठी हा निर्णय फारच धक्कादायक असल्याचं पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या यादीमध्ये ‘खतरों के खिलाडी’ हा शो पहिल्या स्थानावर आहे. तर कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ हा टॉप ५ मध्येदेखील त्याचं स्थान पटकावू शकला नाही.

टीआरपीच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर लोकप्रिय ठरलेला ‘नागिन ३’ हा कार्यक्रम असून या कार्यक्रमात प्रत्येक वेळी येणारे नवनवीन वळणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या शोनंतर तिसऱ्या स्थानावर एकाच वेळी दोन कार्यक्रमांनी बाजी मारली आहे. ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हे दोन शो तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर एकता कपूरची ‘कसौटी जिंदगी की २’ हा कार्यक्रम आहे.

तिसऱ्या स्थानाप्रमाणेच पाचव्या स्थानावरदेखील एकाच वेळी दोन कार्यक्रमांची वर्णी लागली आहे. त्यानुसार, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कुमकुम भाग्य’ हे कार्यक्रम आहेत. त्यानंतर सहाव्या स्थानावर ‘तुझसे है राबता’ आणि ‘सुपर डान्सर चॅप्टर ३’ या शोचा नंबर लागतो. विशेष म्हणजे या पहिल्या सहा क्रमांकांनंतर कपिल शर्माला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

दरम्यान, ‘द कपिल शर्मा’ हा कार्यक्रम सातव्या स्थानावर असून आठव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमे ‘तारक मेहता का उल्टा चश्म आणि ‘नजर’, ‘गुड्डन तुमसे न हो पाएगा’ आणि ‘गठबंधन’ हे कार्यक्रम आहेत. तर दहाव्या स्थानावर ‘दिव्य दृष्टि’, ‘शक्ति: अस्तित्व के अहसास की’ आणि ‘कृष्णा चली लंदन’ यांचा क्रमांक लागतो.