26 February 2021

News Flash

पूजा-गश्मीरच्या ‘त्या’ व्हायरल चॅट मागचं जाणून घ्या सत्य

पूजा सावंतची पोस्ट सध्या चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत चर्चेत आहे. या चर्चा पूजा आणि अभिनेता गश्मीर महाजनीचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या चॅटवरुन ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्या चॅट मागचे सत्य समोर आले आहे.

पूजा आणि गश्मीरचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह यू मित्रा’ असे आहे. या चित्रपटात पूजा आणि गश्मीर मुख्य भूमिकेत दिसणार असून इतर कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

नुकताच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे मोशन पोस्टर शेअर करत तिने ‘मित्र ही एक अशी व्यक्ती असते जी कायम आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते… लव्ह यू मित्रा’ असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पूजा आणि गश्मीरचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चॅटवरुन ते एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. पण ते चॅट त्यांचा आगामी चित्रपट ‘लव्ह यू मित्रा’मधील असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 5:52 pm

Web Title: truth behind pooja sawant and gashmir mahajan chat avb 95
Next Stories
1 कठीण काळात वडिलांनी पण मदत केली नाही – कंगना रणौत
2 इथे राहतात सौ. माने, स्वानंदी बेर्डेची रंगमंचावर एण्ट्री
3 क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स २०२०-२१; चला जाणून घेऊया समीक्षकांची पसंती
Just Now!
X