News Flash

सोनी म्युझिकने सलमानच्या तीन गाण्यांसाठी मोजले २० कोटी

यापूर्वी 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातील गाण्यांना १७ कोटी रुपये मिळाले होते.

salman,kabir,tubelight,ट्युबलाइट,कबीर खान,सलमान खान
दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी 'ट्युबलाइट' चित्रपटात सलमान खान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता सलमान खानचा आगामी ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत असून सलमानसोबत त्याचा हा तिसरा चित्रपट आहे. प्रदर्शनापूर्वीच लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच धमाकेदार कमाईला सुरुवात केली आहे. चित्रपटामध्ये असणाऱ्या तीन गाण्यांचे अधिकार तब्बल २० कोटींना विकण्यात आले आहेत. सोनी म्युझिक कंपनीने सलमानच्या तीन गाण्याचे अधिकार मिळविण्यासाठी २० कोटी रुपये मोजले आहेत. तीन गाण्यांना मिळालेल्या भरमसाठ रकमेमुळे चित्रपटाच्या कमाईची सुरुवात दमदार झाली, असेच म्हणावे लागेल. सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ज्या प्रमाणे धमाका करतो, अगदी त्याचप्रमाणे प्रदर्शनाच्यापूर्वी चित्रपटाला मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्याचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धम्माल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील गाण्यांना १७ कोटी रुपये मिळाले होते.

सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी यापूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. या फोटोंना चांगली पसंती मिळाल्याचे दिसले. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्ये ज्या प्रमाणे चिमुकली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. त्याचप्रमाणे या चित्रपटातील माटिन रे तंगू या बालकलाकाराला पसंती मिळताना दिसत आहे. कबीर खानच्या ‘ट्युबलाइट’मध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये माटिन रे तंगू या बालकलाकारासह चिनी अभिनेत्री झू झू सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.

सलमान आगामी चित्रपटामध्ये नेहमीपेक्षा एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. चित्रपटाचे कथानकाविषयी बोलायचे तर हा चित्रपट भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून या चित्रपटातून कबीर खान प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीची प्रेमकथा दाखविणार आहे. चित्रपटातील गाण्यांना प्रदर्शनापूर्वी मिळालेली भलीमोठी रक्कम पाहता येणाऱ्या काळात ‘ट्युबलाइट’ चांगलाच प्रकाश झोतात येणार असल्याचे संकेतच मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 9:11 pm

Web Title: tubelight salman khan film has 3 songs rights sold for rs 20 crore
Next Stories
1 … म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले
2 Meri Pyaari Bindu : परिणीतीच्या आवाजातील ‘माना के हम यार नही’ गाणे प्रदर्शित
3 खिलाडी अक्षय कुमार-किंग खानचे पुन्हा ‘स्टार वॉर’
Just Now!
X