22 November 2019

News Flash

Video Viral : ‘तुझ्यात जीव रंगला’मधील प्रामाणिक राणादा होणार चोर

हार्दिकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे

गेल्या काही दिवसांपासून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा पहिलवान गडी राणादा याचा मालिकेत मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात होते. या मालकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाल्याने या चर्चा सुरु होत्या. आता खुद्द राणादा उर्फ हार्दिक जोशीने याचा खुलासा केला आहे.

हार्दिकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो चोराच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. R R उर्फ राजा राजगोंडा या पाकिटमाराची भूमिका आता राणादा ‘तुझ्यात जीव रंगाला’मध्ये साकारणार असल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

राजा राजगोंडा! R R!

A post shared by Hardeek Joshi (@hardeek_joshi) on

यापूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंवरुन मालिकेत राणा दाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात होते. राणाचा मृत्यू हा चाहत्यांसाठी धक्काच होता. आता राणादा पुन्हा मालिकेत दिसणार की नाही किंवा त्याच्या जागी दुसरा कोणता कालाकार दिसणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. आता या चाहत्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे राणादाने शेअर केलेल्या व्हिडिओमधून मिळाली आहेत.

साधा आणि प्रामाणिक राणादा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. आता चोरी करणारा राणादा प्रेक्षकांना भावणार का आणि अंजली बाईंच्या आयुष्यात पाकिटमार राणादा काय बदल घडवणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

First Published on June 25, 2019 10:56 am

Web Title: tujhat jiv rangala fem ranada is now seen as robber in the serial avb 95
Just Now!
X