News Flash

‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातार लवकरच रुपेरी पडद्यावर

या चित्रपटातील गायत्रीची भूमिका ही इशाच्या भूमिकेपेक्षा एकदम उलट असणार आहे.

गायत्री दातार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळे गायत्री अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. गायत्रीचे चाहते आता तिला लवकरच रुपेरी पडद्यावर पाहू शकणार आहेत. कारण आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटात गायत्री मुख्य भूमिका साकारणार आहे. सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीज’ चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. यामध्ये अभिनेता भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गायत्री म्हणाली, ‘कोल्हापूर डायरीज या चित्रपटात प्रेक्षक मला एका वेगळ्याच भूमिकेत पाहतील. आतापर्यंत मी ज्या साध्या इशा निमकरची भूमिका साकारली, त्याच्या एकदम विरुद्ध अशी चित्रपटातील भूमिका आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीची ही भूमिका आहे.’

अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. गायत्री आणि भूषणसोबतच यामध्ये महेश शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत आहे. नायक आणि खलनायक या दोन्ही पात्रांचा लूक प्रदर्शित झाल्यावर आता प्रत्येकाला गायत्रीच्या लूकची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 11:43 am

Web Title: tula pahate re fame gayatri datar debut film kolhapur diaries
Next Stories
1 … म्हणून जॅकी चॅनला वाटते या गोष्टीची खंत
2 …जेव्हा आमिर शाहरुखच्या पार्टीत स्वत:साठी जेवणाचा डब्बा घेऊन पोहोचतो
3 सलमानलाही करायचंय दीपिकासोबत काम
Just Now!
X