बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. परिणामी संजय दत्त आता उपचारासाठी परदेशात जाणार आहे. दरम्यान संजयने कर्करोगावर मात करुन लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी अभिनेत्री काम्या पंजाबी हिने प्रार्थना केली आहे. संजू बाबा पूर्णपणे बरा होईपर्यंत अखंड ज्योत पेटवेन असा निर्धार तिने केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – सुशांत मृत्यू प्रकरण: अभिनेते शेखर सुमन यांनी केली रियाच्या अटकेची मागणी

सर्वाधिक वाचकपसंती – “हे तर धर्मांधतेचं लक्षण”; बंगळुरुमधील घटनेवर प्रकाश राज संतापले

“मी गणपती बाप्पाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतेय. मी बाबासाठी अखंड ज्योत पेटवेन. मला खात्री आहे तूम्ही लवकरच बरे व्हाल. १० वर्षांची असल्यापासून मी तुमची फॅन आहे. मी तुम्हाला मेहबूब स्टुडिओमध्ये भेटले होते. त्यावेळी तुम्ही मला zippo भेट म्हणून दिलं होतं. मी तिच क्रेझी गर्ल आहे.” अशा आशयाचं ट्विट काम्या पंजाबीने केलं आहे.

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर संजय लवकरच उपचारांसाठी विदेशात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दोन दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. दरम्यान, संजयला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. तसंच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.