20 September 2020

News Flash

Khatron Ke Khiladi-Made In India : शुटींगदरम्यान जय भानुशाली जखमी

व्हिडीओ शेअर करत जयने दिली माहिती

छोट्या पडद्यावरील विशेष चर्चिला जाणारा आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे खतरों के खिलाडी. नुकताच या शोचं १० वं पर्व पार पडलं. त्यानंतर आता लवकरच या शोचा नवा भाग ‘खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया’ (Khatron Ke Khiladi-Made In India)’ हा येणार आहे. सध्या या नव्या शोचं चित्रीकरण सुरु असून सेटवर अभिनेता जय भानुशाली जखमी झाला आहे. जयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

जयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला जखम झाल्याचं दिसून येत आहे. चित्रीकरणादरम्यान जखमी #Khatronkekhiladimadeinindia. मात्र पुढच्या स्टंटसाठी पुर्णपणे तयार आहे. मला नक्की शुभेच्छा द्या, असं कॅप्शन जयने या व्हिडीओला दिलं आहे. मात्र जखमी झाल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम आहे. त्यामुळे अनेक जण त्याचं कौतूक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

Injured while shooting for #khatrokekhiladimadeinindia but all set for one more stunt #reels #reelitfeelit @colorstv WISH ME LUCK!!

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali) on

दरम्यान, खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया या शोमध्ये छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. यात जय भानुशालीसह रित्विक धन्जनी, हर्ष लिंबाचिया, रश्मी देसाई, निया शर्मा, जॅस्मीन भसीन, करण वाही हे कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 3:08 pm

Web Title: tv jay bhanushali injured shooting khatron ke khiladi shared video and said wish me luck ssj 93
Next Stories
1 श्रुती मोदी आहे तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी
3 सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…
Just Now!
X