13 December 2019

News Flash

गुंगीचं औषध देऊन केला अत्याचार, टीव्ही अभिनेत्रीचा ज्युनिअर आर्टिस्टवर आरोप

ही अभिनेत्री आता गर्भवती आहे

प्रतीकात्मक छायाचित्र

‘कहानी घर घर की’ आणि ‘नच बलिए’ या सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्री तिच्या जुनिअर आर्टिस्टवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने आरोप केलेल्या व्यक्तीचं नाव विनीत असं असून त्याने गुंगीचं औषध देऊन बेशुद्धावस्थेत असताना  तिच्यावर अत्याचार केल्याचं या अभिनेत्री सांगितलं. इतकंच नाही तर ही अभिनेत्री आता गर्भवती असल्याचंही तिने सांगितलं.

‘जनसत्ता’च्या माहितीनुसार, “१३ ऑक्टोबर रोजी मुंबईमधील यमुनानगर येथील एका हॉटेलमध्ये विनीतने मला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर संधीच्या फायदा घेत त्याने माझ्यावर अत्याचार केला. मी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर वारंवार विनीतकडे लग्नाच्या मागणीसाठी तगादा लावला. मात्र त्याने लग्न करण्यासाठी सपशेल नकार दिला”, असं पीडित अभिनेत्रीने सांगितलं.

विनीतने नकार दिल्यानंतर अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तिने विनीतविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून विनीतच्या कुटुंबियांवरही काही आरोप केले आहेत. त्याच्या कुटुंबियांना सत्यपरिस्थिती माहित असतानादेखील ते विनीतला साथ देत असल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान, विनीत आणि पीडित अभिनेत्रीची पहिली भेट मुंबईमध्येच झाली होती. ही अभिनेत्री ‘कहानी घर घर की’ आणि ‘नच बलिए’ व्यतिरिक्त ‘देश में निकला होगा चांद’ या मालिकेतही झळकली आहे.

 

First Published on November 15, 2019 2:31 pm

Web Title: tv serial nach baliye kahanai ghar ghar ki fame actress alleged junior artist to rape her ssj 93
Just Now!
X