News Flash

‘ऋषी कपूर यांनी वाचवले होते प्राण’; पद्मिनी कोल्हापुरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग

जाणून घ्या,नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यांच्या आठवणींमध्ये चाहते आणि सेलिब्रिटी भावूक होताना दिसतात. यात अनेकदा चाहते त्यांच्या आठवणींना विविध माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यावेळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांची एक जुनी आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी ऋषी कपूर यांनी पद्मिनी यांचे प्राण वाचवल्याचं त्यांनी सांगितलं.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘इंडियन आयडॉल १२’ या शोमध्ये अलिकडेच पद्मिनी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी मंचावर पवनदीपने तुमसे प्यार आणि ये जमीन..ही दोन गाणी सादर केली. विशेष म्हणजे त्याची ही गाणी ऐकल्यानंतर पद्मिनी यांनी ऋषी कपूर यांची एक आठवण शेअर केली. यावेळी बोलताना ऋषी कपूर यांनी दोन वेळा माझा आगीतून प्राण वाचवला असं त्या म्हणाल्या.

वाचा : प्रेक्षकांसाठी विशाखा सुभेदारचा नवा संकल्प; नव्या वर्षात करणार ‘ही’ गोष्ट

”होगा तुमसे प्यारा कौन’ या गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना संपूर्ण सेटला आग लागली होती. त्यावेळी ऋषी कपूर यांनी माझे प्राण वाचवले होते. इतकंच नाही तर प्रेमरोगच्यावेळी देखील असाच प्रसंग घडला होता. तेव्हादेखील सेटला आग लागली होती. मात्र, त्यावेळीदेखील ऋषी कपूर यांनी माझे प्राण वाचवले होते”, असं पद्मिनी कोल्हापूरे म्हणाल्या.

वाचा : वडिलांच्या इच्छेखातर धर्मेशने केलं ‘हे’ काम

पुढे त्या म्हणतात,” ऋषी कपूर केवळ दिग्गज अभिनेताच नव्हते, तर ते उत्तम व्यक्तीदेखील होते. इतरांना मदत करण्यासाठी ते कायम सज्ज असायचे. दोन वेळा त्यांनी माझे प्राण वाचवले त्यामुळे त्यांच्याप्रती असलेला माझा आदर दुप्पटीने वाढला.”

दरम्यान, ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात पद्मिनी कोल्हापुरे यांनी सहभागी स्पर्धकांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सायली या सहभागी स्पर्धकाला भेट म्हणून मराठमोळी नथदेखील दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 4:31 pm

Web Title: tv show indiani dol bollywood actress padmini kolhapure share some memory ssj 93
Next Stories
1 आमिर खानच्या घरी लगीनघाई, इरा खान करते तयारी
2 चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीने उत्तर देत केली बोलती बंद
3 वडिलांच्या इच्छेखातर धर्मेशने केलं ‘हे’ काम
Just Now!
X