बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. काही कलाकार तर एकाच शाळेत शिक्षण घेत होते. यामधील एक जोडी म्हणजे बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना. करण आणि ट्विंकलच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. एक वेळ तर अशी होती जेव्हा करण जोहर ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. याचा खुलासा खुद्द ट्विंकलेन केला होता.

२०१५मध्ये ट्विंकल खन्नाने तिचे पुस्तक लाँच करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यावेळी तिने करण आणि तिच्या मैत्रीचे किस्से देखील सांगितले होते. ट्विंकल ही एकटी मुलगी होती जिच्या प्रेमात करण जोहर होता. करणने त्याच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती.

करण आणि ट्विंकल एका बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. त्यावेळी एक दिवस त्यांनी तेथून पळून जायचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर करणला सर्वांसमोर शिक्षा देण्यात आली होती आणि त्याच्या कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती.

करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने चित्रपटातील टिना या भूमिकेची ट्विंकल खन्नाला ऑफर दिली होती. पण ट्विंकलने चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर राणी मुखर्जीने हे पात्र साकारण्यास होकार दिला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले.