04 March 2021

News Flash

निताराचा ‘रॉक अॅण्ड रोल’ व्हिडिओ पाहिला का?

तुम्हालाही तुमचे जुने दिवस नक्कीच आठवतील

मैत्रिणींसोबत खेळताना नितारा

बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाची मुलगी नितारा बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या ‘स्टार किड’पैकी एक आहे. ट्विंकल तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच निताराचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. आताही तिने नितारा आणि तिच्या मैत्रिणीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शेअर करताना तिने लिहिले की, या छोट्या त्यांच्या स्टेज परफॉर्मन्ससाठी तयार होत आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही तुमचे जुने दिवस नक्कीच आठवतील.

काही दिवसांपूर्वीही ट्विंकलने निताराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत नितारा एक हातोडा घेऊन उभी राहिलेली दिसत होती. फक्त ट्विंकलच नाही तर अक्षयही त्याच्या व्यग्र कारभारातून आपल्या मुलीसाठी वेळ काढतो. या व्हॅलेंटाईनला अक्षयने मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये नितारा मार्शलचे काही प्रकार करताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले होते की, व्हॅलेंटाईन डेला कोणत्याही मुलाला तुमचा फायदा उचलायला देऊ नका. मार्शल आर्ट शिका. कारण तुम्हालाही माहित नाही, कधी तुम्हाला याची गरज पडेल. लवकर शिका मार्शल आर्ट नेहमीच तुमची मदत करेल.

अक्षय नेहमीच सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या चाहत्यांना आयुष्याला उपयुक्त असे मोलाचे सल्ले देत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आयुर्वेदाचे महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. अक्षय आणि ट्विंकलचा मोठा मुलगा आरवही ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 8:26 pm

Web Title: twinkle khanna share a video nitara and her girl gang
Next Stories
1 मोदींच्या ‘अच्छे दिन’बाबत केलेले ते ट्विट दारुच्या नशेत; कपिल शर्माची कबुली
2 कादर खान यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया
3 गुरमेहर कौर प्रकरणी रणदीप हुड्डाची सारवासारव
Just Now!
X