News Flash

कर्नाटकच्या राज्यपालांविषयीचं ट्विट उदय चोप्राला पडलं महागात

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांचा भाजपशी संबंध असल्याचं ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी उदय चोप्राला केलं ट्रोल

उदय चोप्रा

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल मंगळवारी लागला. या निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्लूलर या पक्षाने आघाडी करत भाजपाला धक्का दिला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर अभिनेता उदय चोप्राने केलेलं एक ट्विट त्याला चांगलंच महागात पडलं. भाजपाच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरून उदयने कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्विट केलं.

‘नुकतंच मी कर्नाटकच्या राज्यपालांविषयी गुगलवर सर्च केलं. ते भाजपा आणि संघाशी निगडीत आहेत अशी माहिती समोर आली. त्यामुळे मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आता काय होणार आहे,’ असं ट्विट त्याने काल (मंगळवारी) संध्याकाळी केलं. उदयच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं.

काहींनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बॉलिवूड आणि राजकारण हे दोन वेगवेगळे विषय असून यांच्यात गोंधळ न घालण्याचा सल्ला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:39 pm

Web Title: uday chopra trolled after his tweet on karnataka governor vajubhai vala
Next Stories
1 VIDEO : ‘धकधक गर्ल’ नव्हे, ही तर ‘स्वप्नांनी रंगणारी परी’
2 परफेक्शनिस्ट आमिरला बिग बींनी दिला कानमंत्र!
3 TOP 5 : नववधू प्रिया मी बावरते, कानच्या रेड कार्पेटवर सोनमचा ‘खुबसूरत’ अंदाज
Just Now!
X