‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला. ही सीरिज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे देशभरातील काही प्रेक्षकांनी या सीरिजवर टीका देखील केली आहे. मोदी आणि भाजपाचा प्रचार करण्यासाठी या सीरिजची निर्मिती केली गेली असा आरोप निर्मात्यांवर केला जात आहे. दरम्यान विरोधकांच्या या आरोपांवर दिग्दर्शक उमेश शुक्ला यानं प्रत्युत्तर दिलं. मोदींचं निःस्वार्थ काम संपूर्ण जगाला कळावं, यासाठी आम्ही या सीरिजची निर्मिती केली असं तो म्हणाला.
अवश्य पाहा – ‘व्यायाम करण्यासाठी जीमची गरज नाही’; अभिनेत्रीने साडीवरच मारले पुशअप्स
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत उमेश शुक्ला यानं ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजवर भाष्य केलं. तो म्हणाला, “नरेंद्र मोदी हे एक करिश्माई व्यक्तिमत्व आहे. त्यांची महत्वाकांक्षा पाहून अचंबित व्हायला होतं. मोदींचं निःस्वार्थ काम संपूर्ण जगाला कळावं, यासाठी आम्ही या सीरिजची निर्मिती केली. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विविध घडामोडिंचं तटस्थ चित्रण आम्ही या सीरिजमध्ये केलं आहे. काही जणांना असं वाटतंय की आम्ही पंतप्रधानांचा प्रचार करण्यासाठी या सीरिजची निर्मिती केली पण असत्य आहे. एका गरीब घरात जन्मलेला मुलगा आज देशाचं प्रतिनिधित्व करतोय ही कल्पनाच मुळात प्रेरणादायी आहे. अन् या प्रेरणेतूनच ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ची निर्मिती झाली.”
अवश्य पाहा – हॉटेलमधील वेटर ते प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा राखी सावंतचा थक्क करणारा प्रवास
‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. ही सीरिज लेखक किशोर मकवाना यांच्या ‘कॉमन मॅन – पीएम नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर आधारित आहे. दिग्दर्शक उमेशनं या पुस्तकाचे हक्क खरेदी करुन यावर या सीरिजची निर्मिती केली आहे. ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे.