20 September 2020

News Flash

#URITeaser : ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’

गेल्यावर्षी जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावर आधारित चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असून त्याचा

'उरी'

गेल्यावर्षी जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावर आधारित चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझर प्रदर्शित होण्याच्या काही वेळापूर्वी चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यामध्ये विकी कौशल कमांडोची भूमिका साकारत आहे.

‘यहीं मौका है उनके दिल मे डर बिठाने का’, ‘ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा’ असे एकाहून एक दमदार संवाद या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. विकी कौशल व यामीसोबतच चित्रपटात मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत.

दि. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पीओकेत घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 12:36 pm

Web Title: uri teaser released movie based on surgical strike vicky kaushal and yami gautam
Next Stories
1 #SuiDhaaga : जाणून घ्या, सुई धागा पाहण्यामागची ‘ही’ पाच कारणे
2 त्यावेळी इरफान खान आणि सुनील शेट्टी माझ्यापाठीशी उभे राहिले- तनुश्री दत्ता
3 Video : प्रेमाची अनुभूती देणारं ‘बॉईज २’ मधील रोमॅंटीक गाणं प्रदर्शित
Just Now!
X