News Flash

ट्रोलरच्या कमेंटवर भडकली अभिनेत्री, इन्स्टाग्रामला केली ही विनंती

नुकताच उर्वशीने शेअर केलेल्या एका फोटोवर ट्रोलरने आक्षेपार्ह शब्द वापरत कमेंट केली आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’मध्ये कोमोलिका बासू हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी ढोकलिया. तिच्या या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच उर्वशीने शेअर केलेल्या एका फोटोवर ट्रोलरने आक्षेपार्ह शब्द वापरत कमेंट केली आहे. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामला याबाबत माहिती देत एक विनंती केली आहे.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. तिच्या त्या फोटोवर एका यूजरने आक्षेपार्ह शब्द वापरत कमेंट केली होती. तिने त्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत इन्स्टाग्रामला विनंती केली आहे. तिने त्या यूजरला इन्स्टाग्रामवर ब्लॉक करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

स्क्रिनशॉट शेअर करत, ‘इन्स्टाग्राम मला असे वाटते की हीच योग्य वेळ आहे या व्यक्तीला डिलिट करण्याची. अशा लोकांना सोशल मीडियावर ब्लॉक करण्यात यावे. धन्यवाद’ असे उर्वशीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:59 pm

Web Title: urvashi dholakia came across a user who tried to troll her avb 95
Next Stories
1 Video : रुईया कॉलेजच्या ‘त्या’ आठवणी सांगते ऋता दुर्गुळे
2 मॅडी आणि रिनाच्या लग्नानंतर काय झालं?; RHTDM च्या सिक्वेलवर काम सुरु
3 पाकिस्तानी अभिनेत्याला सुशांतच्या मृत्यूमुळे बसला धक्का; म्हणाला…
Just Now!
X