News Flash

काय?? फक्त १५ मिनिटांसाठी उर्वशी रौतेलाने घेतलं इतक्या कोटींचं मानधन

उर्वशीने आकारलेले मानधन ऐकून व्हाल थक्क!

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या एका महागड्या ड्रेसमुळे चर्चेत आली होती. केवळ एका फोटोशूटसाठी तिने तब्बल ५० लाखांचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंची वारंवार चर्चा रंगताना दिसते. त्यातच आता उर्वशीने केवळ १५ मिनिटांच्या डान्स परफॉर्मन्ससाठी तब्बल कोटयवधींचं मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे.

‘डीएनए’च्या वृत्तानुसार, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईतील Palazzo Versace या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी उर्वशीला आमंत्रित करण्यात आलं असून यात तिचा एक डान्स परफॉर्मन्स असणार आहे.

Palazzo Versace येथे आयोजित कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स करण्यासाठी उर्वशीने तब्बल ४ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे उर्वशीचा हा डान्स परफॉर्मन्स केवळ १५ मिनिटांचा असणार आहे.

वाचा : रुपाली भोसलेचा ‘कार’नामा; फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, उर्वशीची लोकप्रियता दिवसेंदिवस विदेशातही वाढू लागली असून लवकरच ती एका आंतरराष्ट्रीय म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर लोकप्रिय गायक मोहम्मद रमादान (Mohamed Ramadan) सोबत फोटो शेअर करत त्याच्यासोबत नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:36 pm

Web Title: urvashi rautela charges four crore rupees for happy new year 2021 appearance ssj 93
Next Stories
1 रुपाली भोसलेचा ‘कार’नामा; फोटो शेअर करत म्हणाली…
2 दिशा पटानीचा बिकिनी फोटो व्हायरल; फक्त दोन तासांत मिळाले इतके लाख लाइक्स
3 रणबीर-आलिया साखरपुडा करणार?; काका रणधीर कपूर यांनी केला खुलासा
Just Now!
X