01 December 2020

News Flash

मिल्खा सिंह यांना पाहून उर्वशी झाली भावूक; आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

उर्वशीनं घेतली मिल्खा सिंह यांची भेट; व्हिडीओ व्हायरल...

बॉलिवू़ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या मादक फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी चक्क ‘द फ्लाइंग सिख’ अर्थात मिल्खा सिंह यांच्यामुळे चर्चेत आहे. उर्वशी विमानतळावर मिल्खा सिंह यांना भेटली. त्यावेळी त्यांना पाहून ती भावूक झाली. अन् तिने पाया पडून त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. हे अविस्मरणीय क्षण तिने आपल्या कॅमेरात देखील कैद केले. “एक महान व्यक्ती मिल्खा सिंह सर यांची आज भेट घेतली. हा एक चमत्कारिक अनुभव होता.” अशा आशयाची कॉमेंट करत तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – VIDEO: ‘करोना अद्याप गेलेला नाही’; पाहा मास्क वापरण्याची योग्य पद्धत

अवश्य वाचा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्

भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे मिल्खा सिंह

‘फ्लाईंग सिख’ या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी १९६० (रोम) व १९६४ (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना अन् कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर ४५.९ सेकंदात पार केले. त्यांचा हा विक्रम अजूनही कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. या अभुतपूर्वक कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 11:31 am

Web Title: urvashi rautela meet milkha singh mppg 94
Next Stories
1 सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये
2 ‘दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली’; करोनावर मात करताच विराजस कुलकर्णीची खास पोस्ट
3 ठरलं तर! प्रभासचा आदिपुरुष ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X