29 October 2020

News Flash

राजस्थानला जाण्यासाठी यूजरने मागितली कार, सोनू सूदने दिले भन्नाट उत्तर

सोनू सूद अनेकांना मदत करताना दिसत आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद अनेकांना मदत करताना दिसत आहे. त्याने अनेक प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली तर काही परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यास मदत केली आहे. आता एका यूजरने राजस्थान जाण्यासाठी सोनू सूदकडे गाडी मागितली आहे. त्यावर सोनू सूदने दिलेले उत्तर चर्चेत आहे.

एका यूजरने ट्विट करत राजस्थानला कुटुंबातील काही सदस्यांना भेटण्यासाठी जायचे आहे आणि त्यासाठी त्याला गाडी हवी असल्याचे सोनू सूदला सांगितले. तसेच ती गाडी त्याला स्वत: ड्रायव्ह करायची आहे असे त्यान पुढे म्हटले. त्याच्या या ट्विटवर सोनू सूदने उत्तर दिले आहे.

‘तुला स्वत: गाडी का चालवायची आहे. मी तुला सोडतो राजस्थानला. तुला कोणती गाडी हवी मला सांग’ असे सोनू सूदने म्हटले आहे. त्याच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु असून अनेकांना हसू अनावर झाले आहे.

यापूर्वी ही सोनू सूदने अनेकांना दिलेल्या उत्तराच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी एका यूजरने प्लेस्टेशन मागितले होते. सोनू सूदने त्याला प्लेस्टेशन न देता पुस्तके देऊन मदत केली होती. तसेच त्याने एका गरीब शेतकऱ्याला ट्र्रॅक्टर भेट म्हणून दिली होता. तर करोना व्हायरसमुळे नोकरी गेलेल्या मुलीला नोकरी मिळवून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:16 pm

Web Title: user ask for car sonu sood give hilarious reply avb 95
Next Stories
1 “साराने अक्षरश: माझ्यासमोर हात जोडले होते,” रोहित शेट्टीचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
2 अथिया शेट्टीने पोस्ट केला स्वीमसूटमधला फोटो; के. एल. राहुलच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
3 अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा
Just Now!
X