News Flash

“मी माझा मानव गमावला”; सुशांतच्या आठवणीनं उषा नाडकर्णी यांना कोसळलं रडू

ऑनस्क्रीन मुलाच्या आठवणीनं उषा नाडकर्णी झाल्या भावूक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता पाच महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी सुशांतच्या आठवणीने भावूक झाल्या आहेत. अलिकडेच त्यांनी झी रिश्ते या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपला पुरस्कार सुशांतला समर्पित केला. शिवाय त्याच्या आठवणी सांगताना त्यांना रडू देखील कोसळलं. त्यांचे ओघळणारे अश्रू पाहून सभागृहातील वातावरण भावूक झालं.

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

उषा नाडकर्णी यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतसोबत काम केलं होतं. त्यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. जवळपास पाच वर्ष ही मालिका सुरु होती. परिणामी उषा आणि सुशांत या दोघांमध्ये जणू आई-मुलाचंच नातं निर्माण झालं होतं. सुशांत उशा नाडकर्णी यांचा खूप आदर करत असे. या पार्श्वभूमीवर सुशांतच्या मृत्यूमुळं उषा नाडकर्णी यांना जबरदस्त धक्का बसला. अन् त्यांनी आपलं दु:ख या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

 

View this post on Instagram

 

A post shared by sushankita (@guggu_minty2119)

अवश्य पाहा – “आम्ही अन्नदाता आहोत दहशतवादी नाही”; शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्याचा केंद्राला टोला

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 6:50 pm

Web Title: usha nadkarni zee rishtey awards 2020 sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 तैमूर की इब्राहिम? करीनाचा आवडता मुलगा कोण?; हा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
2 सायली, रियासह भूषणचा ‘मनमौजी’ अंदाज
3 ‘क्राइम पेट्रोल’मधून अनुप सोनी बाहेर? ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
Just Now!
X